फोंडा, गोवा येथील सौ. मधुरा मनोज सहस्रबुद्धे यांना मंत्रपठणाच्या वेळी आलेल्या अनुभूती
१. मंत्रपठणाच्या वेळी आज्ञाचक्रावर संवेदना जाणवणे
‘१७.८.२०२२ या दिवशी आम्ही दुपारी ४.३० वाजता रामनाथी येथील सनातनच्या आश्रमात मंत्रपठणासाठी बसलो होतो. त्या वेळी ‘नवग्रह मंत्र’ म्हणत असतांना माझ्या आज्ञाचक्रावर पुष्कळ चांगल्या संवेदना जाणवू लागल्या.
२. रामरक्षा स्तोत्र म्हणतांना छापील कागद सजीव जाणवून नादतत्त्वाची अनुभूती येणे
नंतर रामरक्षा स्तोत्र म्हणण्यासाठी मी रामरक्षेचा छापील कागद हातात घेतला. तो छापील कागद सजीव असल्याचे मला जाणवू लागले. मला ‘रामरक्षेमधील शब्द ध्वनीच्या रूपात हात आणि कागद यांमधील पोकळीतून पसरत आहेत’, असे वाटू लागले. मला ही अनुभूती संपूर्ण रामरक्षा स्तोत्र म्हणत असतांना जाणवत होती.
३. कृतज्ञता
या अनुभूती आश्रमातील चैतन्य आणि प.पू. गुरुदेवांच्या (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या) आशीर्वादामुळेच मला अनुभवता आल्या. यासाठी प.पू. गुरुदेवांच्या कोमल चरणी कोटीशः कृतज्ञता !’
– सौ. मधुरा मनोज सहस्रबुद्धे (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के), ढवळी, फोंडा, गोवा. (१७.८.२०२२)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |