गुरुदेवांच्या दर्शनाने, मी भाग्यशाली झाले।
पूर्वीच्या काळी पहाटे जात्यावर दळण दळतांना स्त्रिया ओव्या गात असत. या ओव्यांमध्ये भगवंताचे स्मरण किंवा त्याला आळवणे हा मुख्य उद्देश असायचा. देवद, पनवेल येथील सनातनच्या आश्रमातील श्रीमती मंदाकिनी चौधरी (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के) यांनी अशाच ओव्या लिहिल्या आहेत. या ओव्यांमध्ये सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले, संत आणि साधक यांचा उल्लेख आहे. त्यांच्यात या सर्वांप्रती असणारा भाव या ओव्यांतून लक्षात येतो.
चांदीच्या संपुष्टात (पात्रात) देव ठेवले चंद्रकांत (देवाचे नाव) ।
गुरुदेव आहेत शांत ।
कळत नाही त्यांच्या मनाचा अंत ।
अचानक घोषित करतात संत ।। १ ।।
जादुगार आहे माझा देव ।
त्यांचा लागत नाही कोणाला ठाव ।। २ ।।
शिवाजी सरकाराला (टीप) गादीवर बसवा ।
परम पूज्यांना त्रिलोकांचा आशीर्वाद असावा ।। ३ ।।
उत्तम कुळी जन्मले, पवित्र कुळी आले ।
गुरुदेवांच्या दर्शनाने, मी भाग्यशाली झाले ।। ४ ।।
तीर्थयात्रेस गेल्यावर तीर्थ पाहिले कुठले कुठले ।
पण रामनाथीच (टीप १) मला चारधाम वाटले ।। ५ ।।
टीप – छत्रपती शिवाजी महाराजांचे हिंदवी स्वराज्य पुन्हा येऊ दे.
टीप १ – सनातनच्या रामनाथी, गोवा येथील आश्रम
– श्रीमती मंदाकिनी विनायकराव चौधरी (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के, वय ८६ वर्षे), सनातन आश्रम, देवद, पनवेल. (जुलै २०२३)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |