सनातनच्या ४८ व्या संत पू. (श्रीमती) निर्मला दातेआजींच्या जवळून जातांना बालसाधिकेला दैवी सुगंध येणे
५.११.२०२२ या दिवशी पू. निर्मला दातेआजी (सनातनच्या ४८ व्या संत, वय ९० वर्षे) रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमातील धान्याशी संबंधित सेवा करण्याच्या समोरील बाजूस आसंदीत बसल्या होत्या. त्या वेळी मी माझ्या मुलीच्या (कु. मैथिली नाटे (आध्यात्मिक पातळी ६४ टक्के, वय ९ वर्षे) हिच्या) समवेत आसंदीलगतच्या कट्ट्यावर बसले होते.
तेव्हा मी मैथिलीला विचारले, ‘‘आसंदीत बसलेल्या आजींना तू ओळखतेस का ?’’ त्यावर तिने ‘नाही’ असे सांगितले. तिने पू. दातेआजींना या आधी कधीच पाहिले नव्हते. मी तिला पू. आजींविषयी माहिती सांगून ‘त्या संत आहेत’, असे सांगितले. तेव्हा मैथिली मला म्हणाली, ‘‘तरीच मगाशी मी त्यांच्या बाजूने जातांना मला पुष्कळ सुगंध आला.’’
नंतर मैथिलीने पू. आजींच्या जवळ जाऊन त्यांना नमस्कार केला. मैथिलीने पू. आजींना तिच्याविषयी सांगून तिला आलेली अनुभूती सांगितली. तेव्हा पू. आजींनी मैथिलीला विचारले, ‘‘तुला कोणता सुगंध आला ?’’ मैथिलीने पू. आजींना सांगितले, ‘‘चमेलीसारखा दैवी सुगंध होता.’’
– सौ. ऋतुजा नाटे (कु. मैथिलीची आई), फोंडा, गोवा. (७.११.२०२२)