Goa : मासाभरात ३ नद्यांमधून वाळू उत्खननास पर्यावरण संमती मिळण्याची शक्यता

पणजी, १० जानेवारी : खाण संचालनालयाने मांडवी, झुवारी आणि शापोरा या ३ नद्यांमधून वाळू उत्खननासाठी पर्यावरण संमतीसाठी (‘Envornmental Clearance’साठी) अर्ज केला आहे. एक मासाच्या कालावधीत पर्यावरण संमती मिळण्याची शक्यता आहे. त्यानंतर पारंपरिक पद्धतीचा वापर करून वाळू उत्खनन करण्यास सरकार अनुमती देईल, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली. राष्ट्रीय समुद्रविज्ञान संस्थेने (एन्.आय.ओ.ने) मांडवी, झुवारी आणि शापोरा या ३ नद्यांमधील वाळू उत्खननाचा अहवाल सादर केला आहे, तर तेरेखोल नदीचा अहवाल येणे शिल्लक आहे, अशी माहिती सावंत यांनी दिली. ते म्हणाले की, इतर राज्यांतून वाळूच्या वाहतुकीशी संबंधित समस्यांचे निराकरण करण्यात आले असून प्रतिफेरी ५०० रुपये शुल्क देऊन गोव्यात वाळू आणता येईल.