पिंपरी (पुणे) शहरात कोयता गँगची दहशत चालूच !
पिंपरी-चिंचवड – भोसरीतील वर्दळीच्या राजमाता जिजाऊ उड्डाणपुलाखाली नुकतेच दारू पिण्यासाठी पैशांची मागणी करत ३ जणांनी कोयत्याचा धाक दाखवत तरुणाला मारहाण करत लुटले. हातातील कोयते हवेत भिरकावत नागरिकांमध्ये दहशत निर्माण केली. यावरून शहरातील कोयता गँगची दहशत चालूच आहे. कोयत्याने आक्रमण करणे, दहशत पसरवणे, कोयता बाळगणे या प्रकरणी ५ गुन्हे नोंद झाले आहेत.
तक्रारदार काळे हे त्यांचा मित्र साजन शेलार समवेत भोसरीतील राजमाता जिजाऊ उड्डाणपुलाखाली उभे होते. त्या वेळी त्यांच्या तोंडओळखीचे असलेले तीनही आरोपी तेथे आले. आरोपी सकट याने तक्रारदाराच्या अंगावर कोयता उगारून त्यांच्याकडे दारू पिण्यासाठी पैसे मागितले; मात्र तक्रारदाराने पैसे देण्यास विरोध केला. याचा राग आल्याने आरोपीने त्यांना मारहाण केली.
संपादकीय भूमिकाजनतेला मुठीत जीव धरून असे किती दिवस बसावे लागणार ? कोयता गँगमधील आरोपींना लवकरात लवकर शिक्षा होणे आवश्यक ! |