‘विकसित भारत संकल्प’ यात्रेच्या रथाचे सांगली येथे आगमन !
सांगली – केंद्रशासनाच्या विविध योजनांची माहिती देणारा ‘विकसित भारत संकल्प’ यात्रेचा रथ १० जानेवारीला सांगलीत आला आहे. रथाचे स्वागत सांगली विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुधीर गाडगीळ आणि सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिका आयुक्त सुनील पवार यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीसमोरून वाजत गाजत या संकल्प रथाचे मारुति चौकात आगमन झाले. या प्रसंगी सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे, भाजपचे ज्येष्ठ नेते श्रीकांत शिंदे, प्रकाश बिरजे, शहर जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग यांसह विविध मान्यवर उपस्थित होते
१९ जानेवारीपर्यंत हा रथ महापालिका क्षेत्रात विविध ठिकाणी शासनाच्या विविध योजनांची माहिती नागरिकांना देणार आहे. या कार्यक्रमात पंतप्रधान लाभार्थी योजनेतील अनिता लोंढे, घरकुल लाभार्थी कमल शिर्के यांनी त्यांचे मनोगत व्यक्त केले. या वेळी मारुति चौकात महापालिकेकडून आयोजित शासनाच्या विविध योजनांची माहिती देणारे प्रदर्शन उभारण्यात आले होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महापालिकेचे ‘ब्रँड अँबॅसेडर’ (भूषण अग्रदूत) दीपक चव्हाण यांनी केले. दुपारी ३ वाजता या यात्रेच्या निमित्त सभा घेण्यात आली.