पुणे शहरामध्ये केवळ ३९८ विनाअनुमती बांधकामांची नोंद !
महापालिकेच्या कारभारावर शंका !
पुणे – शहरांमध्ये विनाअनुमती बांधकामे मोठ्या प्रमाणामध्ये उभारली गेली आहेत. यातील बहुतांश बांधकामे ही उपनगरांमध्ये दिसून येतात. असे असतांनाही महापालिकेतील आकडेवारीनुसार केवळ ३९८ विनाअनुमती बांधकामे आहेत. वर्ष २०२२ मध्ये महापालिकेने ६ सहस्र १७९ बांधकामांना नोटिसा दिलेल्या होत्या. त्यांपैकी ३ सहस्र ९१८ बांधकामांवर कारवाई करण्यात आल्याची माहिती महापालिका प्रशासनाने सर्वसाधारण सभेत दिली होती; मात्र २ वर्षांमध्ये शहरांमध्ये विनाअनुमती बांधकामांची संख्या अल्प कशी झाली ? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
गेल्या काही वर्षांमध्ये विनाअनुमती बांधकामांवरील कारवाई वेगाने करण्यात येत आहे. त्यानुसार आतापर्यंत १६ लाख चौरस फूट क्षेत्र मोकळे करण्यात आले आहे. त्यामुळे विनाअनुमती बांधकामांची संख्या अल्प झाली असल्याचे महापालिकेचे म्हणणे आहे.
संपादकीय भूमिका :असे असेल, तर संबंधित अधिकार्यांनाच शिक्षा द्यायला हवी ! असे झाल्यास कधीतरी समाजाला शिस्त लागेल का ? |