मराठवाड्यात अजून २ दिवस पाऊस !
१३ जानेवारी नंतर थंडीत वाढ होण्याची शक्यता !
नाशिक – पश्चिमी चक्रवातामुळे उत्तरेत वाढलेली थंडी, ईशान्येकडील आर्द्रतायुक्त वारे आणि दक्षिणेकडून वहाणार्या वार्यांच्या संयोगातून महाराष्ट्रासह दक्षिणेकडील राज्यात ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. मराठवाडा, कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रात काही ठिकाणी २ दिवस पावसाचा अंदाज आहे. १३ जानेवारीनंतर थंडीत वाढ होण्याची शक्यता नागपूर वेधशाळेने वर्तवली आहे. मराठवाडा, कान्हादेश, पश्चिम महाराष्ट्रासह कोकणात ९ आणि १० जानेवारी या दिवशी दिवसभर ढगाळ वातावरण होते. काही भागात तुरळक पाऊसही पडला. सायंकाळनंतर वारे वहात असल्याने गारवा जाणवत होता.
हिवाळ्यात हृदयरुग्णांत ५० टक्क्यांची वाढ !हिवाळ्यात शरिराची चयापचय क्रिया वेगाने होते. त्यामुळे हृदयरोगाचे प्रमाण हिवाळ्यात ५० टक्क्यांनी वाढते. या काळात आहार-विहाराची विशेष काळजी घ्यावी. – आधुनिक वैद्य मिलिंद खर्चे, हृदयरोगतज्ञ (कार्डिओलॉजिस्ट) |