कुशीनगर (उत्तरप्रदेश) येथील विवेकानंद शुक्ला यांनी सनातनच्या आश्रमाला दिली सदिच्छा भेट
रामनाथी (गोवा) – उत्तरप्रदेशच्या कुशीनगर येथील रहिवासी आणि गाझियाबाद येथे उत्तरप्रदेश राज्य कर सहआयुक्त (जी.एस्.टी.) म्हणून कार्यरत असलेले श्री. विवेकानंद शुक्ला यांनी ५ जानेवारी २०२४ या दिवशी रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमाला सदिच्छा भेट दिली. या वेळी त्यांच्यासमवेत त्यांच्या पत्नी सौ. मनीषा शुक्ला आणि मोठा मुलगा कु. यशस्वीन आणि छोटा मुलगा कु. ओजस्वीन उपस्थित होते. सनातनचे साधक श्री. अभिजित सावंत यांनी त्यांना आश्रमात चालणार्या राष्ट्र आणि हिंदु धर्म, तसेच आध्यात्मिक संशोधन यांविषयीच्या कार्याची माहिती दिली.