भारतात बनावट कागदपत्रांद्वारे रोहिंग्यांना वसवणार्या टोळीचा मुख्य सूत्रधार अबू सालेह याला अटक !
लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) – भारतात रोहिंग्या घुसखोरांना वसवण्याच्या टोळीचा मुख्य सूत्रधार अबू सालेह मंडल याला उत्तरप्रदेशच्या आतंकवादविरोधी पथकाने अटक केली आहे. तो मुळचा बंगाल येथील रहाणारा आहे. तो २ खासगी संस्था चालवतो. त्याला देश आणि विदेश येथून निधीही मिळतो. त्याला काही वर्षांत ५८ कोटी रुपये निधी मिळाला होता. हा पैसा तो रोहिंग्यांना वसवण्यासाठी खर्च करत होता.
अबू याने उत्तरप्रदेशातील देवबंद येथील मदरशातून शिक्षण घेतलेले आहे. तो बनावट भारतीय कागदपत्रे बनवून म्यानमारमधून घुसखोरी करून आलेल्या रोहिंग्यांना भारतातील विविध शहरांत वसवत होता. पोलिसांनी यापूर्वी त्याच्या टोळीतील ६ जणांना अटक केली होती; परंतु अबू पसार होता. त्याची माहिती देणार्याला ५० सहस्र रुपयांचे बक्षिस देण्याची घोषणाही पोलिसांनी केली होती.
संपादकीय भूमिका
|