उत्तरप्रदेशात ‘इस्लामिक स्टेट’च्या २ आतंकवाद्यांना अटक !
अलीगड (उत्तरप्रदेश) – राज्याच्या आतंकवादविरोधी पथकाने अलीगडमधून ‘इस्लामिक स्टेट’च्या एका आतंकवाद्याला अटक केली आहे, तर दुसर्या एका आतंकवाद्याने न्यायालयासमोर आत्मसमर्पण केले आहे. अटक करण्यात आलेल्या ‘इस्लामिक स्टेट’च्या आतंकवाद्याचे नाव अमास उर्फ फराज अहमद असे आहे. तो २२ वर्षांचा आहे आणि अलीगड मुस्लिम विद्यापिठाचा पदवीधर आहे. आत्मसमर्पण करणार्या आतंकवाद्याचे नाव अब्दुल समद मलिक असे आहे. अलीगडमध्ये आतंकवादी कारवायांशी संबंधित हे २ आतंकवादी उत्तरप्रदेश पोलिसांना हवे होते.
१. उत्तरप्रदेशच्या आतंकवादविरोधी पथकाने नोव्हेंबर २०२३ मध्ये अलीगड मुस्लिम विद्यापिठाच्या विद्यार्थी संघटनेशी संबंधित अब्दुल्ला अर्सलान आणि माज बिन तारिक यांना अटक केली होती. दिवाळीच्या काळात बाँबस्फोट घडवण्याची त्यांची योजना होती.
२. यानंतर उत्तरप्रदेशच्या आतंकवादविरोधी पथकाने ‘इस्लामिक स्टेट’चा आणखी एक आतंकवादी वजीहुद्दीन अली खान याला दुर्ग, छत्तीसगड येथून अटक केली होती. वजीहुद्दीन अली खान अलीगड मुस्लिम विद्यापिठात ‘पी.एच्.डी.’ करत होता. (मुसलमान अशिक्षित असल्यामुळे ते आतंकवादाकडे वळतात’, असे सांगणार्यांना याविषयी काय म्हणायचे आहे ? – संपादक)