Anti-Hindu Congress : काँग्रेसच्या नेत्याने श्रीरामभक्तांना शिवीगाळ करून हाकलून लावले !
|
जयपूर (राजस्थान) – ‘कृष्ण कुंज विलास व्हेलफेअर सोसायटी’चे अध्यक्ष तथा काँग्रेसचे नेते जगदीश चौधरी यांनी येथे श्रीराममंदिराच्या अक्षता घरोघरी पोचवणार्या रामभक्तांना शिवीगाळ करून त्यांना हाकलून देऊन त्यांचा अपमान केला. ही घटना ‘सीसीटीव्ही’ कॅमेर्यात नोंद झाली आहे.
Hindus will neither forget, nor forgive Congress' traditional Hinduphobia!
Congress leader abused and drove away Shri Ram devotees.
राम मंदिर प्राण प्रतिष्ठा I हिन्दू विरोधी #RamMandirPranPratishtha pic.twitter.com/wFNdGDkG9P
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) January 10, 2024
२२ जानेवारी २०२४ या दिवशी श्रीराममंदिराचा प्राणप्रतिष्ठा सोहळा होणार आहे. या पार्श्वभूमीवर श्रीरामभक्त ठिकठिकाणी फेर्या काढून लोकांमध्ये उत्साह निर्माण करत आहेत. त्यासाठी १ जानेवारीपासून पूजन केलेल्या अक्षतांचे वाटप करण्याची सेवा चालू आहे. ही सेवा १५ जानेवारीपर्यंत चालू रहाणार आहे. श्रीरामभक्तांचा हा उत्साह काही लोकांना सहन होत नाही आणि त्यामुळेच रामभक्तांच्या अवमानाच्या घटना घडत आहेत. राजस्थानमध्ये श्रीरामभक्तांशी गैरवर्तन करण्यात आले. यासह मध्यप्रदेशमध्येही धर्मांध मुसलमानांच्या जमावाने श्रीरामभक्तांवर दगडफेक केल्याची आणि तलवारीने आक्रमण केल्याची घटना नुकतीच समोर आली होती.