डॉक्टरांनी अहवाल आणि औषधांची चिठ्ठी लिहितांना सुवाच्च अक्षर काढण्यासाठी परिपत्रक काढा !
ओडिशा उच्च न्यायालयाचा राज्यशासनाला आदेश
भुवनेश्वर (ओडिशा) – ओडिशा उच्च न्यायालयाने राज्यशासनाला डॉक्टरांकडून देण्यात आलेली औषधांची चिठ्ठी (प्रिस्क्रीप्शन) किंवा रुग्णाचा अहवाल लिहिणे यांविषयी परिपत्रक काढण्याचा आदेश दिला आहे. यात डॉक्टरांनी सुवाच्च अक्षरांत माहिती लिहिण्यास किंवा मोठ्या अक्षरांत टंकलेखन करण्यास सांगितले आहे. या संदर्भात आतापर्यंत देशातील काही न्यायालयांनी डॉक्टरांना या सदंर्भात सूचनाही केल्या आहेत.
उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींना एका सुनावणीच्या वेळी डॉक्टरांनी लिहिलेला शवविच्छेदनाचा अहवाल वाचतांना कठीण जात होते. डॉक्टरांनी लिहिलेला मजकूर नीट समजत नव्हता. यावरून न्यायमूर्तींनी वरील आदेश दिला.
संपादकीय भूमिका
|