Madarsa Teachers Honorarium Stopped : उत्तरप्रदेश सरकारकडून मदरशांना देण्यात येणारे अतिरिक्त मानधन रहित !
लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) – उत्तरप्रदेश सरकारने मदरशांचे आधुनिकीकरण करण्याच्या योजनेद्वारे तेथील शिक्षकांना देण्यात येणारे अतिरिक्त मानधन बंद केले आहे. केंद्र सरकारच्या आदेशानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. याचा परिणाम राज्यातील २५ सहस्र मदरसा शिक्षकांवर होणार आहे. या शिक्षकांना येथे विविध विषय शिकवण्यास नियुक्त करण्यात आले आहे.
सौजन्य : सलाम टीव्ही
राज्यशासनाकडून पदवीधर शिक्षकांना २ सहस्र आणि पदव्युत्तर शिक्षकांना ३ सहस्र रुपये अतिरिक्त मानधन देण्यात येत होते. या योजनेच्या अंतर्गत पदवीधर शिक्षकांना केंद्र सरकारकडून ८ सहस्र रुपये आणि पदव्युत्तर शिक्षकांना १५ सहस्र रुपये मानधन देण्यात येत होते.