Illegal Mazar Delhi Flyover : नवी देहलीतील उड्डाणपुलावरील बेकायदेशीररित्या बांधलेले थडगे प्रशासनाने हटवले !
नवी देहली – देहलीतील आझादपूर उड्डाणपुलावर बेकायदेशीररित्या बांधण्यात आलेले मुसलमानाचे थडगे (मजार) सार्वजनिक बांधकाम विभागाने कारवाई करत पाडून टाकले. या वेळी मोठ्या संख्येने पोलिसांना तैनात करण्यात आले होते. रस्त्याच्या कडेला हे थडगे बांधण्यात आल्याने वाहतुकीला अडचण निर्माण झाली होती. या संदर्भात अनेक तक्रारी आल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. (जे सर्वांना दिसत होते, त्यासाठी कुणाला तक्रार करायची काय आवश्यकता होती ? प्रशासन आंधळे होते का ? हे थडगे बांधले जात असेपर्यंत प्रशासन झोपले होते का ? – संपादक) थडग्याचे कथित व्यवस्थापन पहाणारे सिकंदर यांनी म्हटले की, नोटीस न देता ही कारवाई करण्यात आली. आम्ही अधिकार्यांशी बोलण्याचा प्रयत्न केला; मात्र त्यांनी आमच्याकडे दुर्लक्ष केले.
सौजन्य : एए न्यूज
Illegally constructed mazar on Delhi's Azadpur flyover demolished by Government after 2 years of protest.
👉 Fanatics involved in such illegal acquisitions (Land J|h@d), should be thoroughly inquired.
👉 Repeated complaints of inconvenience for 2 years, led administrative… pic.twitter.com/8e9HD60DLH
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) January 10, 2024
संपादकीय भूमिकाहा धर्मांधांचा भूमी जिहाद असून संबंधितांवर कठोर कारवाई करणे आवश्यक ! |