कलियुगातही सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत बाळाजी आठवले यांच्या कृपेने भावपूर्ण मातृसेवा करणारे पुत्र लाभलेल्या ६५ टक्के आध्यात्मिक पातळीच्या कै. (श्रीमती) नंदा परब !
‘२५.१०.२०२३ या दिवशी रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात पूणवेळ साधना करणारे श्री. रामानंद परब (६८ टक्के आध्यात्मिक पातळी) यांची आई कै. नंदा बाळकृष्ण परब (वय ७१ वर्षे) यांचे निधन झाले. रामानंद यांनी आईची दीर्घकाळ सेवा केली होती.
त्यांचे सांत्वन करायला गेलेले काही जण म्हणाले, ‘‘आई सुटल्या.’’ ते ऐकून रामानंददादांचे भाऊ श्री. मिलिंद परब म्हणाले, ‘‘मी तिच्यासाठी कितीही वेळ जप करायला सिद्ध असायचो. मी आईच्या कपाळावर हात ठेवून सद्गुरु डॉ. मुकुल माधव गाडगीळकाका यांनी दिलेला नामजप रात्र-रात्र करत बसायचो. त्यानंतर तिला झोप लागत असे.’’ तेव्हा माझ्या मनात विचार आला, ‘या कलियुगात परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेने असे पुत्र पोटी येण्याचे भाग्य रामानंददादांच्या आईला लाभले.’
– श्रीमती गीता प्रभु, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१३.११.२०२३)