मनोज जरांगे यांना मुंबईत मैदानाची अनुमती देऊ नये ! – अधिवक्ता गुणवंत सदावर्ते
मुंबई – व्यावसायिक आस्थापने सांकेतिक भाषेत बंद पाडली जाऊ शकतात. शाळा बंद पडतील, पोषण आहार थांबतील. त्यामुळे आझाद मैदान, बिकेसी, शिवाजी पार्क अशा कुठल्याच मैदानात मनोज जरांगे यांना मोर्चासाठी अनुमती देण्यात येऊ नये. यासाठी आम्ही पोलीस प्रशासनाकडे तक्रार दिली आहे, असे अधिवक्ता गुणवंत सदावर्ते यांनी मुंबईत आंदोलन करत स्पष्ट केले. ते प्रथमपासून मराठा आरक्षणाच्या विरोधात आहेत.
मनोज जरांगे हे मराठ्यांच्या आरक्षणासाठी ३ कोटी मराठ्यांचा मोर्चा घेऊन मुंबईत येणार आहेत, या पार्श्वभूमीवर ते बोलत होते.