वसई (जिल्हा पालघर) येथील मिक्सरच्या कारखान्याला भीषण आग !

‘जेपान’ कारखान्याला लागलेली आग

मुंबई – वसई (पूर्व)- येथील कामण जाधववाडीमधील मिक्सर सिद्ध करणार्‍या ‘जेपान’ नावाच्या कारखान्याला ९ जानेवारीच्या पहाटे ४ वाजताच्या कालावधीत भीषण आग लागली. यामध्ये मिक्सर बनवण्यासाठी आणलेला सर्व कच्चा माल, तसेच अन्य साहित्य जळून खाक झाले. स्थानिकांनी या दुर्घटनेची माहिती वसई-विरार महानगरपालिका प्रशासनाला दिल्यावर थोड्याच वेळात अग्नीशमनदलाचे जवान घटनास्थळी आले. स्थानिक नागरिकांच्या साहाय्याने आग विझवली आहे. यावेळी जीवितहानी झालेली नाही.