लोहगाव येथील नव्या टर्मिनलचे १५ जानेवारीपर्यंत उद्घाटन न केल्यास आम्हीच करू ! – काँग्रेसची चेतावणी
पुणे – लोहगाव विमानतळावरील नवीन टर्मिनल १५ जानेवारीपर्यंत चालू न झाल्यास १६ जानेवारीला आम्ही टर्मिनलचे उद्घाटन करू, अशी चेतावणी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष मोहन जोशी यांनी दिली आहे. विमानाने प्रवास करणार्यांची संख्या वाढत असल्याने कोट्यवधी रुपये खर्च करून लोहगाव विमानतळावर नवीन टर्मिनल उभारले आहे. याचे काम ऑगस्ट २०२३ पूर्वीच पूर्ण होऊन चाचणीही झाली आहे. त्यामुळे हे टर्मिनल लवकर कार्यान्वित करावे. नव्या टर्मिनलचे उद्घाटन सप्टेंबरमध्ये होईल, असे हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी घोषित केले होते; मात्र ते झाले नाही.