ठाणे पोलिसांनी केले ९ कोटी ३५ लाख ३८ सहस्र ४४५ रुपये किमतीच्या चोरीला गेलेल्या मुद्देमालाचे हस्तांतरण
ठाणे, ९ जानेवारी (वार्ता.) – ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील ५ परिमंडळांत ३५ पोलीस ठाणी आहेत. या पोलीस ठाण्यांच्या हद्दीत गहाळ झालेल्या, तसेच चोरीला गेलेल्या मुद्देमालाचे तक्रारदारांना हस्तांतरण करण्याचा कार्यक्रम ८ जानेवारीला ठाणे येथील डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृहात आयोजित करण्यात आला होता. महाराष्ट्र पोलीस वर्धापनदिन आणि ‘रायझिंग डे’चे औचित्य साधत ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे, सहआयुक्त दत्ता कराळे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या हस्ते तक्रारदारांना ९ कोटी ३५ लाख ३८ सहस्र ४४५ रुपये किमतीच्या हरवलेल्या, चोरट्यांनी लांबवलेल्या वस्तू, तसेच सोनसाखळी आणि भ्रमणभाष संच चोरीच्या घटनांमध्ये लांबवलेला मुद्देमाल ठाणे पोलिसांनी तक्रारदारांना परत केला.
संपादकीय भूमिकासोनसाखळी चोरांचा कायमचा बंदोबस्त करण्यात पोलीस का अल्प पडत आहेत ? पोलीस आणि भुरटे चोर यांचे लागेबांधे असतात, असा आरोप वारंवार होतो. याविषयीची विश्वासार्हता टिकवता येण्यासाठी पोलीस प्रशासन काही करणार का ? |