सोलापूर येथील धर्मप्रेमी श्री. शुभम् चंद्रकांत रोहिटे यांना आलेल्या अनुभूती

श्री. शुभम् रोहिटे

१. साधनेला आरंभ केल्यावर घरातील भांडणे न्यून होऊन सर्व जण आनंदी होणे

‘पूर्वी आमच्या घरात विनाकारण भांडणे होत असत. मी ‘हिंदु जनजागृती समिती’च्या कार्यात सहभागी झालो. नंतर समितीच्या कार्यकर्त्यांनी मला ‘साधना कशी करायची ?’, याविषयी माहिती दिली. त्यांनी सांगितल्याप्रमाणे मी साधना करू लागलो. त्यानंतर आमच्या घरातील भांडणे बंद झाली आणि आम्ही सर्व जण आनंदी झालो.

२. सात्त्विक अत्तर लावल्यामुळे कुटुंबीय आणि शेजारी यांचे त्रास न्यून होऊन त्यांच्यात साधनेची आवड निर्माण होणे

मी नेहमी सात्त्विक अत्तर वापरतो. त्या अत्तरामुळे पूर्वी घरातील सर्वांना, तसेच शेजार्‍यांनाही ‘मळमळणे, डोके दुखणे’, असे त्रास होत असत. त्यामुळे माझे कुटुंबीय मला ‘हे अत्तर लावू नकोस’, असे सांगत असत; पण मी त्यांचे ऐकले नाही. काही दिवसांनी ते अत्तर संपले. तेव्हा कुटुंबीय मला विचारू लागले, ‘‘तू ते अत्तर का लावत नाहीस ?’’ त्यानंतर मी ‘साधकांनी सांगितलेले नामजपादी उपाय करणे आणि अत्तर लावणे’, असे करू लागलो. त्यामुळे कुटुंबीय आणि शेजारी यांचे सर्व त्रास न्यून झाले अन् त्यांच्यात साधनेची आवड निर्माण झाली.

‘गुरुदेव, ‘तुमच्याच कृपेमुळे मला या अनुभूती आल्या’, त्याबद्दल मी तुमच्या चरणी कोटीशः कृतज्ञ आहे.’

– श्री. शुभम् चंद्रकांत रोहिटे, सोलापूर (३.२.२०२३)