अयोध्येत शरयू नदीच्या काठावर १०० हवनकुंड बांधले !
१ सहस्र ८ शिवलिंगांचीही स्थापना करणार !
अयोध्या – येथे २२ जानेवारी या दिवशी होणार्या श्री रामललाच्या प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर शहरात ८ जानेवारीपासून सांस्कृतिक कार्यक्रम चालू झाले आहेत. या प्रसंगी सहस्रावधी साधू-संत अयोध्येत हवन-पूजा करण्यासाठी येणार आहेत. १७ जानेवारीपासून हवन-पूजेला प्रारंभ होणार आहे. यासाठी अयोध्येत शरयू नदीच्या काठावर १०० हवनकुंड बांधण्यात आले आहेत. तसेच शरयूच्या काठावर जबलपूरहून येणार्या १ सहस्र ८ शिवलिंगांची स्थापना केली जाणार आहे. शहरात २२ जानेवारी होणार्या कार्यक्रमाची मोठ्या प्रमाणात सिद्धता चालू असल्याने शहरातील वातावरण राममय झाले आहे.
अयोध्येत ८ जानेवारीपासून रामकथा आणि सांस्कृतिक कार्यक्रम यांची मालिका चालू झाली आहे. हा महोत्सव होळीपर्यंत म्हणजे २४ मार्चपर्यंत चालू रहाणार आहे. रामकथा पार्कमध्ये विविध धर्मगुरु रामकथेवर प्रवचन करणार आहेत.