मांढरदेव (ता. वाई) येथील श्री काळूबाई यात्रेच्या वेळी कलम ३६ लागू !

  • पोलीस अधीक्षक समीर शेख यांची माहिती !

  • पशूबळी आणि वाद्य वाजवण्यास मनाई !

मांढरदेव (ता. वाई) येथील श्री काळूबाई मांढरदेवी मंदिर

सातारा – मांढरदेव (ता. वाई) येथील श्री काळूबाई मांढरदेवी यात्रेनिमित्त २४ जानेवारी ते ९ फेब्रुवारी या कालावधीत कलम ३६ लागू करण्यात आले आहे. त्यानुसार पशूबळी देण्यास आणि वाद्य वाजवण्यास मनाई करण्यात आली असल्याची माहिती सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी दिली. (पोलीस अधिकारी शेख असे कलम इतर धर्मियांच्या उत्सवांच्या वेळी लागू करतील का ? बकरी ईदच्या वेळी पशूबळी देण्यास ते मनाई करतील का ? – संपादक)

पोलीस अधीक्षक समीर शेख

समीर शेख पुढे म्हणाले की, मुंबई पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३६ नुसार असलेल्या अधिकाराचा वापर करून कायदा आणि सुव्यवस्थेच्या बंदोबस्तासाठी नेमलेल्या सर्व संबंधित पोलीस अधिकारी अन् त्यांच्याहून वरिष्ठ पोलीस अधिकारी यांना हे अधिकार प्रदान केले आहेत. हे अधिकार पोलीस ठाणे हद्दीतील जनतेचे आरोग्य, सुरक्षा आणि कायदा आणि सुव्यवस्था अबाधित रहावी म्हणून प्रदान करण्यात आले आहेत.

संपादकीय भूमिका

  • हिंदूंच्या धार्मिक प्रथांमध्ये हस्तक्षेप करणारे पोलीस सर्वोच्च न्यायालयाचा आदेश असूनही मशिदींवरील भोंगे मात्र बंद करण्यास घाबरतात. बहुसंख्य हिंदूच्या देशात हिंदूंच्या यात्रेवरच निर्बंध लागू होणे सरकारी यंत्रणांना लज्जास्पद !