Stone Pelting On Hindus : शाजापूर (मध्यप्रदेश) येथे हिंदूंच्या फेरीवर दगडफेक !
|
शाजापूर – २२ जानेवारी या दिवशी अयोध्येत श्रीराममंदिरात भगवान श्रीरामाचा प्राणप्रतिष्ठा सोहळा आयोजित करण्यात आला आहे. त्यासाठी हिंदु समाजाकडून प्रतिदिन संध्याकाळची फेरी काढण्यात येत आहे. त्याच अनुषंगाने ८ जानेवारी या दिवशी मध्यप्रदेशातील शाजापूर जिल्ह्यात ३० ते ४० हिंदूंनी संध्याकाळची फेरी काढली होती. ही फेरी अखंड आश्रमासमोरील रस्त्यावरून जात असतांना मुसलमान जमावाने फेरी अडवली आणि शिवीगाळ करत फेरीवर दगडफेक केली. या घटनेत हिंदु समुदायातील ६ जण गंभीररित्या घायाळ झाले. त्यानंतर हिंदु संघटनेच्या लोकांनी पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट (दाखल) केली आणि आरोपींच्या विरोधात कारवाई करण्याची मागणी केली. या प्रकरणी पोलिसांनी ४४ मुसलमानांच्या विरोधात गुन्हा नोंदवला आहे.
सौजन्य : News18 MP Chhattisgarh
तक्रारीत पुढे म्हटले आहे की, काही मुसलमान तलवारी घेऊन हिंदूंना मारण्यासाठी धावले. जमावामधून मंजूर खान नावाच्या व्यक्तीने फेरीतील हिंदूंवर तलवारीने आक्रमण केले. त्यात ललित कुशवाह याच्या डोक्याला दुखापत होऊन रक्तस्राव चालू झाला. दगडफेकीत कुणाल देवतवाल, ढोली सोनू मालवीय, प्रशांत कुशवाह, चेतन प्रजापती, निखिल प्रजापती इत्यादी घायाळ झाले. या प्रकरणी आतापर्यंत ८ जणांना अटक करण्यात आली असून इतरांचा शोध चालू आहे, असे पोलिसांनी सांगितले.
Stone pelting by M mob including women on Shri Ram's procession in Shajapur (Madhya Pradesh) on 8th January.
The mob pelted stones and attacked Hindus with swords while claiming, 'This is a M dominant area and Shri Ram's procession will not be tolerated here'
6 Hindus badly… pic.twitter.com/JP9FMz8GCt
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) January 9, 2024
संपादकीय भूमिका
|