बलात्कार प्रकरणी पुणे येथील उपनिरीक्षक युवराज शिंदे यांच्यावर गुन्हा नोंद !
पत्नीवर ‘अॅट्रॉसिटी’अंतर्गत गुन्हा नोंद !
पुणे – विवाहाचे आमीष दाखवून एका ३२ वर्षीय युवतीवर बलात्कार केला. या प्रकरणी मार्केट यार्ड पोलीस ठाण्यातील उपनिरीक्षक युवराज शिंदे यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला. (अशा पोलिसांना तात्काळ अटक करून बडतर्फ करत कठोर शिक्षा होणे आवश्यक ! असे केल्याने पोलिसांची समाजातील प्रतिमा स्वच्छ होईल ! – संपादक) तसेच या युवतीला जातीवाचक शिवीगाळ करणे, मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी उपनिरीक्षक शिंदे यांच्या पत्नी काजल यांच्यावर ‘अॅट्रॉसिटी’ (अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा) या कायद्यांतर्गत गुन्हा नोंद केला आहे. या युवतीने स्वारगेट पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट (दाखल) केली होती. हा प्रकार १० जुलै २०२३ ते ४ डिसेंबर २०२३ या कालावधीत घडला आहे.
तक्रारदार युवतीची उपनिरीक्षक शिंदे यांची ओळख होती. शिंदे यांनी या युवतीचा विश्वास संपादन केला. वेळोवेळी तिच्याकडून महागड्या भेटवस्तूही घेतल्या, तसेच अनेकवेळा तिच्यावर बळजोरी केली. संबंधित युवतीने लग्नाची विचारणा केल्यानंतर शिंदे याने तिच्याशी असलेले संबंध तोडले.