भारतियांच्या दृष्टीने ‘संस्कृती’ आणि ‘सामाजिक सुधारणा’ यांतील भेद !
‘संस्कृती’ (कल्चर) आणि ‘सामाजिक सुधारणा’ (सिव्हिलायझेशन) या दोन शब्दांच्या अर्थामध्ये पाश्चिमात्य लेखक जो भेद करतात, तो ध्यानी घेता भारतीय श्रद्धा ही संस्कृती प्रधान वाटते.
संस्कृती म्हणजे विचार, विवेक ! विकारांनी स्वतः बनते ती सामाजिक सुधारणा, म्हणजे मनुष्य जी साधनसंपत्ती वापरतो ती. सामाजिक सुधारणा काहीही प्रयत्न न करता पिढ्यान् पिढ्या संक्रांत होऊ शकते. संस्कृती प्रत्येक व्यक्तीने प्राप्त करून घ्यायची असते. उपयोग करणारी व्यक्ती ही उपयोगात आणणार्या साधनांपेक्षा श्रेष्ठ; म्हणून तर व्यक्तीगुण वाढले पाहिजेत. त्यामानाने साधनसामुग्री वाढली नाही, तरी हरकत नाही.’
– प.पू. गुरुदेव काटेस्वामीजी
(साभार : मासिक ‘घनगर्जित’, एप्रिल २०२२)