कै. प्रभाकर प्रभुदेसाई यांच्या निधनानंतर घरी आलेले साधक आणि पाहुणे यांना त्यांच्या घरात जाणवलेला पालट !
१. सासर्यांचे निधन झाल्यानंतर घरी आलेल्या पाहुण्यांना चैतन्य जाणवणे
‘माझे सासरे कै. प्रभाकर भालचंद्र प्रभुदेसाई यांचे निधन झाल्यानंतर आमच्या घरी नातेवाईक आणि साधक आले होते. तेव्हा त्यांनी सांगितले, ‘‘एखाद्याचे निधन झाल्यानंतर आम्ही त्यांच्या घरी गेल्यावर ‘तेथून लवकर निघून जावे’, असे वाटते; परंतु तुमच्या घरी आल्यानंतर ‘येथे कुणाचे निधन झाले आहे’, असे वातावरण जाणवत नाही. ‘तुमच्या घरात भय किंवा त्रास’, असे काहीच वाटत नाही. उलट आम्हाला तुमच्या घरात चैतन्यच जाणवत आहे. आम्ही तुमच्या घरी यापूर्वीही आलो होतो. त्यापेक्षा आता पुष्कळ चांगले जाणवत आहे.
२. माझे यजमान श्री. योगेश प्रभुदेसाई यांनी दुःख करत बसण्यापेक्षा ‘वडिलांना चांगली गती मिळावी’,अशी प्रार्थना करणे
माझे यजमान श्री. योगेश प्रभुदेसाई यांना वडिलांच्या मृत्यूनंतर ‘पुनःपुन्हा रडू येणे, त्यांची आठवण होणे’, असे विचार येण्यापेक्षा ते ‘बाबांना चांगली गती मिळावी. ते गुरुचरणी रहावेत. त्यांची साधना चालू रहावी’, अशी प्रार्थना करत होते आणि घरातही सर्वांना प्रार्थना करायला सांगत होते.’
– सौ. राधा योगेश प्रभुदेसाई (कै. प्रभाकर प्रभुदेसाई यांची सून), सनातन आश्रम, देवद, पनवेल. (३.१२.२०२३)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |