आजपासून आदित्य ठाकरे यांचा कोल्हापूर जिल्हा दौरा !
कोल्हापूर – उद्धव ठाकरे गटाचे नेते आणि आमदार आदित्य ठाकरे ९ आणि १० जानेवारीला कोल्हापूर जिल्ह्याच्या दौर्यावर आहेत. या दौर्यात आदित्य ठाकरे यांची कोल्हापूर मतदारसंघ आणि हातकणंगले मतदारसंघ अशा ठिकाणी २ जाहीर सभा होणार आहेत. पहिली सभा ९ जानेवारीला दुपारी ३ वाजता गारगोटी येथे होणार आहे, तर दुसरी सायंकाळी ६ वाजता कोल्हापूर शहरात मिरजकर तिकटी येथे होईल. १० जानेवारीला हुपरी येथे कार्यकर्त्यांचा मेळावा होणार आहे, अशी माहिती उद्धव ठाकरे गटाचे कोल्हापूर जिल्हाप्रमुख संजय पवार यांनी पत्रकारांना दिली.
नियोजनासाठी करवीर तालुकाप्रमुख राजू यादव यांनी प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते यांची बैठक घेतली. राजू यादव म्हणाले, ‘‘आगामी निवडणुकांसाठी आदित्य ठाकरे यांचा दौरा महत्त्वपूर्ण असून यामुळे सैनिकांमध्ये नवऊर्जा पसरणार आहे.’’ या वेळी दीपक रेडेकर, संतोष चौगुले, योगेश लोहार, कैलास जाधव उपस्थित होते.