Israel Lakshadweep: आता इस्रायलकडून लक्षद्वीपचे कौतुक: भारताचे अप्रत्यक्ष समर्थन !
नवी देहली – भारत सरकारच्या विनंतीवरून आमचे अधिकारी लक्षद्वीपच्या समुद्रातील खारटपणा नष्ट करण्याच्या प्रक्रियेस साहाय्य करण्याच्या गेल्या वर्षी तेथे गेले होते. या प्रकल्पावर आम्ही उद्यापासून काम चालू करणार आहोत. आतापर्यंत ज्यांनी लक्षद्वीपच्या समुद्रातील प्राचीन आणि दैवी सौंदर्य पाहिलेले नाही, त्यांच्यासाठी आम्ही काही छायाचित्रे जोडत आहोत’, अशी पोस्ट भारतातील इस्रायली दूतावासाने ‘एक्स’वरून प्रसारित केली आहे. या पोस्टसमवेत त्याने ‘एक्सप्लोर इंडियन आयलंड्स’ (भारतीय बेटांचा शोध घ्या) या हॅशटॅगचाही वापर केला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर मालदीव देशातील काही मंत्र्यांनी टीका केली होती. त्यांपैकी एका मंत्र्याने पंतप्रधान मोदी यांना ‘इस्रायलची कठपुतळी’ म्हणून संबोधले होते. त्यामुळेच इस्रायली दूतावासाने भारताचे स्पष्ट समर्थन केल्याचा अप्रत्यक्ष संदेश या पोस्टमधून दिल्याचे म्हटले जात आहे.