श्रीकृष्णजन्मभूमी प्रकरणातील पक्षकाराला पाकिस्तानमधून धमकी !
मथुरा (उत्तरप्रदेश) – श्रीकृष्णजन्मभूमी प्रकरणाचे पक्षकार आतुशोष पांडे यांना पाकिस्तानमधून फेसबुकवरून धमकी देण्यात आली आहे. पांडे यांनी याविषयी पोलीस, तसेच केंद्रीय गृह सचिव आणि राज्याचा गृह विभाग यांच्याकडे तक्रार केली आहे. पोलीस अधीक्षकांनी हे प्रकरण सायबर विभागाकडे सोपवले आहे.
श्रीकृष्णजन्मभूमीच्या १८ दाव्यांमधील एक पक्षकार असलेले आशुतोष पांडे यांनी त्यांचे फेसबुक पान हॅक झाल्याचा आरोप केला आहे. फेसबुक पानावर अश्लील लिखाण करण्यात आले आहे. पाडे यांना पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाकडून अनेकदा जिवे मारण्याच्या धमक्या मिळाल्या आहेत.
संपादकीय भूमिका
|