गुहा (अहिल्यानगर) येथील श्री कानिफनाथ देवस्थान हिंदूंचेच !
साम्यवादी पक्षांच्या पाठिंब्याने श्री कानिफनाथ महाराजांनी मूर्ती हटवण्यासाठी धर्मांध मुसलमानांचे उपोषण !
नगर – राहुरी तालुक्यातील गुहामधील श्री कानिफनाथ देवस्थान ही वक्फ मंडळाची मालमत्ता असल्याचा दावा साम्यवादी पक्षाच्या साहाय्याने मुसलमानांनी केला होता. (हिंदु धर्माच्या विरोधात धर्मांधांना पाठबळ देणार्या साम्यवादी पक्षांचा धूर्तपणा जाणा ! – संपादक) येथील श्री कानिफनाथ महाराजांची मूर्ती हटवण्यासाठी मुसलमान समाजातील काहींनी उपोषण चालू केले आहे. असे असतांना ‘हे देवस्थान हिंदूंचेच आहे’, अशी ठाम भूमिका आदिवासी एकलव्य संघटना आणि वडार समाज संघटना यांनी घेतली आहे. मंदिराच्या रक्षणासाठी प्रसंगी रस्त्यावर उतरण्याची सिद्धता या संघटनांसह समस्त हिंदु समाजाने घेतली आहे.
१. याविषयी एकलव्य आदिवासी बहुउद्देशीय सामाजिक संस्था (महाराष्ट्र राज्य) यांच्या वतीने राहुरी तालुक्याचे तहसीलदार चंद्रजित राजपूत यांना निवेदन देण्यात आले. निवेदन देतांना या एकलव्य आदिवासी बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचे प्रदेशाध्यक्ष योगेश सूर्यवंशी यांसह अन्य पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
२. अखिल महाराष्ट्र राज्य आणि डार समाज संघटनेकडून नायब तहसीलदार श्रीमती दळवी यांना निवेदन देण्यात आले. या वेळी जिल्हाध्यक्ष संपत नायकवाड, राहुरी तालुकाध्यक्ष प्रदीप (अण्णा) धनवडे यांसह अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.
संबंधितांवर योग्य ती कारवाई करण्याची मागणी
या निवेदनांमध्ये म्हटले आहे की, मोगलांच्या आक्रमणात कानिफनाथ मंदिरातील कानिफनाथ महाराजांची मूर्ती नष्ट करण्यात आली. त्या वेळी अतोनात प्रयत्न करून हिंदूंनी हे मंदिर वाचवले. त्यामुळे श्रीनाथ भक्तांनी पुन्हा या ठिकाणी कानिफनाथ महाराजांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली आहे; मात्र या विरोधात काही मुसलमान उपोषणाला बसले आहेत. त्यांना काही हिंदुविरोधी संघटनांनी पाठिंबा दिला आहे. हे प्रकरण हिंदुविरोधी असल्यामुळे काही संघटना या प्रकरणात उडी घेत आहेत. त्यामुळे या प्रकरणी योग्य ती कारवाई करावी.’’
काय आहे प्रकरण ?
या देवस्थानाची जागा वक्फ बोर्डद्वारे बळकावण्याचा प्रयत्न धर्मांध करत आहेत. १३ नोव्हेंबर २०२३ या दिवशी या मंदिरात भजन करणार्या भाविकांवर काही मुसलमान समाजकंटकांनी आक्रमण करून मारहाण केली. याच्या निषेधार्थ २१ नोव्हेंबर या दिवशी समस्त धर्मप्रेमी हिंदूंनी तहसील कार्यालयावर निषेध मोर्चा काढला होता. त्यानंतर २८ डिसेंबर २०२३ या दिवशी हिंदु समाजाकडून या देवस्थानामध्ये कानिफनाथ महाराजांच्या मूर्तीची स्थापना करण्यात आली आहे.
संपादकीय भूमिका
|