Pakistan Bomb Blast : पाकमधील खैबर पख्तूनख्वा प्रांतातील बाँबस्फोटात ५ पोलीस ठार
इस्लामाबाद (पाकिस्तान) – पाकिस्तानमधील खैबर पख्तूनख्वा प्रांतामध्ये ८ जानेवारीला झालेल्या एका शक्तीशाली बाँबस्फोटात ५ पोलिसांचा मृत्यू झाला, तर २० हून अधिक लोक घायाळ झाले. पोलिसांना लक्ष्य करून हा स्फोट घडवण्यात आला. हे पोलीस पोलिओविरोधी अभियानाच्या सुरक्षेसाठी जात असतांना हा स्फोट झाला. ही घटना अफगाणिस्तानच्या सीमेजवळ असलेल्या मामुंद भागात घडली. हे आक्रमण कुणी केले ? हे अद्याप स्पष्ट झालेले नसले, तरी यापूर्वी पोलिओविरोधी अभियानावर तालिबान्यांनी आक्रमणे केली असल्याने त्यांच्याकडून हे आक्रमण झाल्याचे म्हटले जात आहे.
5 policemen killed in an IED blast in Pak's Khyber Pakhtunkhwa province; 22 injured #PakistaniTaliban pic.twitter.com/lJZkUn4bEG
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) January 8, 2024
१. या आक्रमणाच्या आदल्या दिवशी खैबर पख्तूनख्वामध्ये आतंकवाद्यांनी केलेल्या गोळीबारात ४ जण ठार झाले होते. याही आक्रमणाचे दायित्व अद्याप कोणत्याही आतंकवादी संघटनेने स्वीकारलेले नाही.
२. खैबर पख्तूनख्वा प्रांतात गेल्या वर्षी ४१९ आतंकवादी आक्रमणे झाली. यांत ६२० जणांचा मृत्यू झाला. यांत सुरक्षादलाचे ३०६ सैनिक, २२२ नागरिक आणि ९२ आतंकवादी यांचा समावेश होता.