लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईत लवकरच महायुतीचा महामेळावा
मुंबई – लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईत लवकरच महायुतीचा महामेळावा होणार आहे. १४ जानेवारीला एकाच जिल्ह्यात ३५ ठिकाणी महायुतीचे मेळावे होणार आहेत. फेब्रुवारीच्या शेवटी महामेळाव्यांचे आयोजन करण्यात आले आहे. मुंबईत छत्रपती शिवाजी महाराज पार्क मैदान किंवा वांद्रे येथील बीकेसी येथे करण्याचे नियोजन चालू आहे. नुकतीच महायुतीतील सर्व घटक पक्षांची बैठक पार पडली. त्यात जानेवारी २०२४ मध्ये राज्यात ठिकठिकाणी जिल्हा आणि तालुका स्तरीय मेळावे आयोजित करण्याचे ठरले आहे.