‘श्रीराम मांसाहार करतो’, अशा प्रकारची विधाने म्हणजे हिंदूंना लहानपणापासून धर्मशिक्षण न दिल्याचा आणखी एक परिणाम !
‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरद पवार गटाच्या शिर्डी येथील शिबिरात ‘श्रीराम मांसाहारी होता’, असे विधान केल्याच्या प्रकरणी गटाचे नेते तथा आमदार जितेंद्र आव्हाड यांच्याविरुद्ध नाशिक येथील पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला. याविषयी नाशिकमधील सुप्रसिद्ध श्री काळाराम मंदिराचे महंत श्री महंत सुधीरदास महाराज यांनी पोलिसांत तक्रार प्रविष्ट केली.’