कर चुकवेगिरी, बेहिशोबी पैसे, हवाला रॅकेट या संदर्भात गेली अनेक वर्षे काही कृती न करणार्या पोलिसांवरही कारवाई करा !
‘आयकर खात्याने २ जानेवारी २०२४ पासून गोवा राज्यातील सुमारे ४० प्रसिद्ध ‘नाईट क्लब’, ‘पब’, उपाहारगृहे आणि हॉटेल्स यांवर धाडी घातल्या आहेत. कर चुकवेगिरी आणि व्यवहारामध्ये बेहिशोबी पैशांचा वापर करणे, या कारणास्तव या धाडी घालण्यात आल्या आहेत. कळंगुट येथील ‘हमेर्झ’, ओरझा समुद्रकिनार्यावरील ‘टीटली कुलीनरी’ मद्यालय, शिवोली आणि मोरजी येथील ‘थलासा’, वागातोर येथील ‘सनडाऊनर’ मद्यालय असे एकूण ४० प्रसिद्ध ‘नाईट क्लब’, मद्यालये आदींवर धाडी घालण्यात आल्या आहेत. आयकर खात्याच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ‘हमेर्झ’ नाईट क्लबचे व्यवस्थापन राज्यातील महत्त्वाचे ‘नाईट क्लब’ आणि मद्यालये यांमधील पैसे हवालाच्या माध्यमातून विदेशात पाठवत होते.’