देवळाचा कारभार अनागोंदी असल्यावर अशा देवळामध्ये देव भाविकांवर प्रसन्न होईल का ? देव जागृत असेल का ?

श्री विठ्ठल-रुक्मिणी

‘श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या लाडवांच्या प्रसादामध्ये घोटाळा करणार्‍यांची पाठराखण, भाविकांसाठी प्रसाधनगृह बांधण्यात झालेला विलंब आणि भाड्यापोटी मंदिराच्या लाखो रुपयांचा अपव्यय, तसेच देवतांच्या दागिन्यांची ताळेबंदामध्ये नोंदी न करण्यात आल्याचा संशयास्पद प्रकार, या दैनिक ‘सनातन प्रभात’ने उघड केलेल्या सर्व अनागोंदी कारभाराची श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरे समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी पत्रकार परिषदेत स्वीकृती दिली. या सर्व प्रकारांमध्ये सुधारणा करण्यासाठी कार्यवाही चालू असल्याचे शेळके यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.’