सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठाच्या परीक्षा विभागाचा गोंधळ अजूनही चालूच !
अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना जुन्याच प्रश्नपत्रिका दिल्याचे प्रकरण !
पुणे – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठाच्या परीक्षा विभागाने संगणक अभियांत्रिकी आणि इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलीकम्युनिकेशन या तृतीय सत्रांच्या परीक्षेत जुन्याच प्रश्नपत्रिका दिल्याने अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या परीक्षा केंद्रात गोंधळ उडाला. हा प्रकार समजल्यानंतर परीक्षा थांबवावी लागली. परीक्षा चालू होण्याच्या काही मिनिटे आधी महाविद्यालयांना इ-मेलद्वारे प्रश्नपत्रिका पाठवली जाते; मात्र अभियांत्रिकीच्या तृतीय सत्राच्या परीक्षेत जुन्या प्रश्नपत्रिका इ-मेल केल्या. महाविद्यालय आणि परीक्षा केंद्र यांनी परीक्षा विभागाशी संपर्क साधून प्रश्नपत्रिका संदर्भात हरकती घेतल्याने तांत्रिक कारणामुळे परीक्षा रद्द करून त्याच दिवशी काही कालावधीनंतर दुसरी प्रश्नपत्रिका केंद्रावर पाठवली. त्यानंतर दोन्ही विषयांची परीक्षा सुरळीत पार पडली, असे स्पष्टीकरण परीक्षा विभागाने दिले.
संपादकीय भूमिका :
|