नाशिक येथे अनधिकृत वृक्षतोड केल्याप्रकरणी न्यायालय प्रशासनाला १ लाख रुपये दंडाची नोटीस !
उद्यान अधीक्षकांची कारवाई
नाशिक – नाशिक जिल्हा न्यायालयाच्या आवारात असलेल्या चिंचेच्या वृक्षाची विनाअनुमती छाटणी करण्यात आली. त्यासाठी महापालिकेच्या उद्यान आणि वृक्ष प्राधिकरण विभागाने न्यायालय प्रशासनाला १ लाख रुपयापर्यंतची दंडाची नोटीस बजावली आहे. या संदर्भात महापालिकेच्या उद्यान आणि वृक्ष प्राधिकरण विभागाकडे तक्रार आल्यानंतर उद्यान अधीक्षक विवेक भदाणे यांनी न्यायालय प्रशासनाला ही नोटीस बजावली. ‘वृक्षाची छाटणी ठेकेदारानेच केली आहे’, असा तोंडी खुलासा न्यायालय प्रशासनाने केला आहे.