Anti-National Demand : बिहारमधील धर्मांध प्राध्यापकाने केली भारतीय मुसलमानांसाठी स्वतंत्र मातृभूमीची राष्ट्रघातकी मागणी !

विद्यार्थ्यांच्या विरोधानंतर प्राध्यापक पदाचे त्यागपत्र देत मागितली क्षमा !

प्रो. खुर्शिद आलम

पाटलीपुत्र (बिहार) : भारतीय मुसलमानांना पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्या जवळ स्वंतत्र मातृभूमी हवी आहे. ‘संयुक्त पाकिस्तान आणि बांगलादेश झिंदाबाद’, अशी पोस्ट सामाजिक माध्यमांतून प्रसारित करणार्‍या खुर्शिद आलम या साहाय्यक प्राध्यापकांच्या विरोधात पोलिसांत तक्रार प्रविष्ट (दाखल) करण्यात आली आहे. खुर्शीद आलम येथील नारायण महाविद्यालयामध्ये राज्यशास्त्र विभागाचे प्रमुख होते. संतप्त विद्यार्थ्यांनी महाविद्यालय परिसरात निदर्शने करत आलम यांच्यावर कारवाईची मागणी केली. आलम यांचा पुतळाही जाळला आणि ‘आलम यांना पदावरून हटवले नाही, तर त्यांच्या वर्गावर बहिष्कार घालणार’, अशी धमकी विद्यार्थ्यांनी दिली. त्यानंतर महाविद्यालय प्रशासनाने आलम यांना कारणे दाखवा नोटीस बजावली. त्यानंतर आलम यांनी साहाय्यक प्राध्यापकपदाचे त्यागपत्र दिले आहे. त्यांनी या प्रकरणी क्षमाही मागितली आहे. ‘माझ्या पोस्टद्वारे मी कधीही कुणाच्याही भावना दुखावण्याचा प्रयत्न केलेला नाही किंवा तसा हेतूही नाही. जर या पोस्टमुळे कुणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील, तर मी यासाठी क्षमा मागतो’, अशी पोस्टही त्यांनी केली आहे.

(म्हणे) ‘भाजप देशाला हिंदु राष्ट्र बनवत आहे !’ – खुर्शिद आलम

खुर्शिद आलम यांनी एका इंग्रजी दैनिकाला प्रतिक्रिया व्यक्त करतांना म्हटले की, आपली राज्यघटना धर्मनिरपेक्ष आहे; पण भाजपने त्याच्या घोषणापत्रात भारताला हिंदु राष्ट्र बनवण्याची घोषणा केली आहे. देश सर्व धर्मांप्रती तटस्थ नाही. न्यायालयांचे निकालही पक्षपाती असतात. (‘भारताची राज्यघटना धर्मनिरपेक्ष आहे’, हे केवळ हिंदु राष्ट्राची मागणी झाल्यावरच मुसलमानांना आठवते. गेली ७५ वर्षे धर्माच्या आधारे सोयीसुविधा उकळतांना, हज यात्रेसाठी अनुदान घेतांना, मदरशांसाठी अनुदान घेतांना, सच्चर आयोगाच्या शिफारसी स्वीकारतांना त्यांना हे आठवले नाही का ? – संपादक) 

संपादकीय भूमिका

अशांनी क्षमा मागितली, तरी त्यांच्या मनामध्ये भारताची आणखी फाळणी करण्याचेच विचार आहेत, हे स्पष्ट होते ! अशांना भारतातून दिवाळखोर होणार्‍या पाकिस्तानमध्ये पाठवणे, हीच मोठी शिक्षा असेल !