Ayodhya Security Arrangements : अयोध्येत २५ सहस्र सैनिक तैनात करणार – सुरक्षाव्यवस्थेवर १०० कोटी रुपये खर्च !
लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) : अयोध्येतील श्रीराममंदिराच्या सुरक्षेसाठी २५ सहस्र सैनिक तैनात करण्यात आले आहेत. मंदिरातील सुरक्षा विशेष कृती दलाकडे असेल. आत्मघातकी आक्रमणे रोखण्यासाठी मंदिराभोवती आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने संरक्षणव्यवस्था सिद्ध करण्यात येत आहे. मंदिराचा परिसर सीसीटीव्हीने सुसज्ज केला जात आहे. संरक्षणव्यवस्थेवर १०० कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. २२ जानेवारीला प्राणप्रतिष्ठेच्या दिवशी सुरक्षा कर्मचार्यांची संख्या अजूनही वाढू शकते.
(सौजन्य : Janta Junction)
25,000 soldiers to be stationed at #Ayodhya : Security arrangements to cost 100 crores
Artificial Intelligence (AI) surveillance is likely to be introduced for the security of the #AyodhyaRamTemple
राम लला I अयोध्या I प्रभु श्री राम#ShriRamBhajan pic.twitter.com/KGn0JKgjz2
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) January 8, 2024
अशी असेल संरक्षणव्यवस्था !
१. शरयू नदीत स्नायपर (दुरून गोळीबार करून लक्ष्याचा अचूक वेध घेणारे) तैनात करण्यात येणार !
२. मंदिराची सुरक्षा ‘लाल’ आणि ‘पिवळ्या’ अशा २ भागांत (‘झोन’मध्ये) विभागली आहे. श्रीराममंदिर ‘रेड झोन’मध्ये, तर हनुमानगढी आणि कनक भवन ‘येलो झोन’मध्ये असणार !
३. केंद्रीय गृहविभाग प्रत्येक ६ महिन्यांनी संरक्षणव्यवस्थेचा आढावा घेणार !