Delhi Minor Gang-rape: देहलीत १२ वर्षांच्या मुलीवर सामूहिक बलात्कार
५ पैकी ३ आरोपी अल्पवयीन !
नवी देहली – येथे २ जानेवारीच्या रात्री एका १२ वर्षांच्या मुलीवर सामूहिक बलात्कार झाल्याची घटना आता उघडकीस आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी एक महिला आणि चहाच्या टपरीचा मालक यांच्यासह ५ जणांना अटक केली आहे. आरोपींपैकी ३ जण १२ ते १५ वयोगटातील आहेत. हे तिघेही चहाच्या टपरीवर काम करत होते.
देहलीत प्रतिदिन बलात्काराचे ३ गुन्हे नोंद होतात !
राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभागाच्या वर्ष २०२२ च्या अहवालानुसार देहली महिलांसाठी सर्वाधिक असुरक्षित शहर आहे. देहलीत प्रतिदिन बलात्काराचे ३ गुन्हे नोंद होत असल्याचे म्हटले आहे.
संपादकीय भूमिकाबलात्कार करणारे अल्पवयीन कसे असू शकतात ? अल्पवयीन असण्याची व्याख्याच आता पालटणे आवश्यक असून अशांना आता कठोर शिक्षा करण्याची तरतूद केली पाहिजे ! |