Moulana Toukir Raza : आमच्या मशिदी हिसकावून घेतल्या जात आहेत ! – मौलाना तौकीर रझा, ‘इत्तेहाद-ए-मिल्लत कौन्सिल’चे प्रमुख
|
नवी देहली – अयोध्येतील श्रीराममंदिराच्या उद्घाटनाचा उत्साह भारतातच नाही, तर जगभरात आहे. असे असले, तरी अनेक धर्मनिरपेक्षतावादी आणि हिंदुद्वेष्ट्या काँग्रेसी यांना पोटशूळ उठला आहे. मुसलमान नेतेही यास विरोध करत आहेत. आता ‘इत्तेहाद-ए-मिल्लत कौन्सिल’चे प्रमुख मौलाना तौकीर रझा यांनी या विरोधात वक्तव्य केले आहे. ते म्हणाले की, मुसलमान प्रत्येक वेळी बलीदान देणार नाहीत. देशातील आमची मशीद आमच्याकडून हिसकावून घेतली जात आहे. ही गोष्ट आम्ही सहन करू शकत नाही.
सौजन्य द लीडर हिन्दी
रझा पुढे म्हणाले की,
१. भाजपचा आमच्या अजानवरही आक्षेप आहे, ही गोष्ट कुणापासून लपलेली नाही की. खरेतर भाजपला मुसलमानांच्या अस्तित्वानेही त्रास होतो.
२. राममंदिरावर जो निकाल दिला गेला, त्यावरून सर्वोच्च न्यायालयाच्या विश्वासार्हतेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित होतो. सर्वोच्च न्यायालयाच्या ज्या न्यायाधिशाने राममंदिरावर निर्णय दिला, त्याला पुढे राज्यसभेत नियुक्त करण्यात आले. याचा अर्थ राममंदिराचा निर्णय आधीच ठरवण्यात आला होता.
३. जर मला कुणी राममंदिराच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला आमंत्रित केले, तरी मी त्याला उपस्थित रहाणार नाही. याचे कारण असे की, त्या कार्यक्रमाचे आयोजन हे धार्मिक कारणातून अल्प, तर राजकीय लाभ मिळवण्यासाठी अधिक प्रमाणात केले जात आहे. (हिंदूंच्या असीम त्यागातून बांधण्यात आलेल्या मंदिरावर आगपाखड करणार्या तौकीर रझा यांना कुणी कधीच निमंत्रण देणार नाही, हे त्यांनी लक्षात ठेवावे ! – संपादक)
Chief of Ittehad-e-Millat Council, Maulana Raza spits venom about the Inauguration of Shree Ram Mandir!
'Mu$l!ms will not sacrifice their interests every time. Our mosque is being snatched away from us in this Nation. We cannot tolerate this fact!' – Raza
The integrity of the… pic.twitter.com/tn6otrGgjf
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) January 7, 2024
|