ईश्वर किंवा गुरु यांचे व्यापकत्व आणि त्यांची प्रत्येक जिवाशी असलेली एकरूपता
‘काही दिवसांपूर्वी माझ्या मनात आले, ‘पृथ्वी एवढी मोठी आहे. जगात इतके लोक आहेत, तरीही ‘एखाद्याच्या मनात आलेला विचार किंवा त्याने केलेली प्रार्थना देवापर्यंत कशी पोचत असेल ? एखाद्या साधकाला त्रास झाला, तर तो देवाला आणि त्याच्या गुरूंना, म्हणजेच गुरुतत्त्वाला कसा समजत असेल ?’, त्यावर देवाने मला सांगितले, ‘तुझ्या शरिरातील कोणत्याही भागावरून एखादी छोटी मुंगी केवळ चालत असेल, तरी तुला तिचा स्पर्श जाणवतो ना ? तुझ्या शरिरावर इतके केस आहेत; पण त्यातील एखादा केस जरी ओढला गेला, तरी तुला कळतो ना ?’, तसेच हे आहे. तुम्ही सर्व जण माझेच अंश आहात. देव किंवा गुरु म्हणजे सर्व जिवांचा समावेश असलेले शरीर आहे. माझे प्रत्येकाकडे लक्ष आहे. मी प्रत्येकात आहे आणि प्रत्येक जण माझ्यात आहे.’ – कु. रूपाली कुलकर्णी, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.