श्री रामलला प्राणप्रतिष्ठापनेच्या निमित्ताने अक्षता कलशाचे धामोडमध्ये स्वागत !
कोल्हापूर – अयोध्या येथे होणार्या श्री रामलला प्राणप्रतिष्ठापनेच्या निमित्ताने धामोड येथे (तालुका राधानगरी) अक्षता कलशाचे उत्साहात स्वागत करण्यात आले. या वेळी महिलांनी कलशाचे औक्षण केले. दुपारनंतर कलश दर्शनासाठी ग्रामपंचायतीत ठेवण्यात आला होता. ग्रामस्थांनी सकाळी बसस्थानकापासून भजन करत लेझीमसह पारंपरिक वाद्यांच्या गजरात कलशाची मिरवणूक काढली. मिरवणुकीत किरण साबणे, मुकुंद पाटील, गणेश नाळे, केरबा बोरनाक, शंकर पाटील, तानाजी पाटील, जयवंत सुतार यांसह अन्य उपस्थित होते.