‘श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्रा’चे निमंत्रण मिळाल्याविषयी ह.भ.प. बाबासाहेब पांडुरंग पाटील (बिसले महाराज) यांचे अभिनंदन !
सांगली – ह.भ.प. बाबासाहेब पांडुरंग पाटील (बिसले महाराज) यांना ‘श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्रा’च्या वतीने श्रीराम मंदिराच्या उद्घाटनाचे निमंत्रण आले आहे. या संदर्भात सांगली येथील अधिवक्ता समीर पटवर्धन यांनी त्यांची कर्नाटक येथील मांजरी (तालुका चिकोडी) येथे जाऊन भेट घेतली. अधिवक्ता पटवर्धन यांनी सर्व हिंदुत्वनिष्ठांच्या वतीने त्यांचे विशेष अभिनंदन केले, तसेच अयोध्या येथील श्रीरामललाच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करण्यास सांगितले. अधिवक्ता समीर पटवर्धन यांनी ह.भ.प. पाटील (बिसले महाराज) यांना ‘सनातन पंचांग २०२४’ भेट दिले. या प्रसंगी श्री. शंभू पटवर्धन हे उपस्थित होते.