रामटेक येथील ‘कवी कुलगुरु कालिदास विद्यापिठा’चे कुलगुरु प्रा. हरेराम त्रिपाठी यांची महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या सुश्री (कु.) तेजल पात्रीकर यांनी घेतली सदिच्छा भेट !
रामटेक (नागपूर) – येथील ‘कवी कुलगुरु कालिदास विद्यापिठा’चे कुलगुरु प्रा. हरेराम त्रिपाठी यांची महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या संगीत समन्वयक सुश्री (कु.) तेजल पात्रीकर यांनी भेट घेतली. या भेटीच्या वेळी सुश्री तेजल पात्रीकर यांनी प्रा. त्रिपाठी यांना महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या संशोधन कार्याविषयी माहिती देऊन विविध संशोधनात्मक केलेले प्रयोग या वेळी दाखवले. याचसमवेत विश्वविद्यालयाच्या माध्यमातून अन्य २ महाविद्यालयांमध्ये स्वतःचे अभ्यासक्रम चालू असल्याचे सुश्री तेजल यांनी प्रा. त्रिपाठी यांना सांगितले.
या भेटीच्या वेळी सनातन संस्थेचे धर्मप्रचारक पू. अशोक पात्रीकर हेही उपस्थित होते. त्यांच्या हस्ते कुलगुरु प्रा. त्रिपाठी यांना भेटवस्तू आणि ‘सनातन पंचांग’ या वेळी भेट देण्यात आले. कवी कुलगुरु कालिदास विद्यापिठाच्या भारतीय दर्शन विभागाच्या प्रमुख डॉ. (सौ.) कलापिनी अगस्ती आणि नियोजन विकास मंडळाचे (प्र) संचालक, तसेच प्राचीन भारतीय विज्ञान-मानव्यशास्त्रसंकाय विभागाचे प्राध्यापक डॉ. प्रसाद गोखले यांचीही या वेळी भेट घेण्यात आली अन् त्यांनाही महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाचे कार्य सांगितले. या सर्वांनी ‘आम्हाला महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाचे कार्य आवडले. आपण एकत्रित कार्य करू शकू’, असा विश्वास या वेळी व्यक्त केला.
महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाचा अभ्यासक्रम चालू करण्याचा विचार करू ! – प्रा. हरेराम त्रिपाठीमहर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाचे कार्य ऐकून प्रा. हरेराम त्रिपाठी यांनी कार्य आवडल्याचे सांगितले. ते म्हणाले, ‘‘आम्हालाही तुमचा अभ्यासक्रम पाठवा. या विद्यापिठातही ते चालू करण्याविषयी आम्ही अभ्यास करू.’’ |