देशात जातीय दंगली घडवण्याच्या हेतूने आव्हाड यांचे वक्तव्य ! – विहिंप आणि बजरंग दलाचा आरोप
जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात भांडुप पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट !
मुंबई, ५ जानेवारी (वार्ता.) – अयोध्या येथे २२ जानेवारी या दिवशी भव्य मंदिरात श्रीरामलला विराजमान होणार आहेत. असे असतांना राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी देशात जातीय दंगली घडवून आणण्यासाठी असे वक्तव्य केले आहे, असा आरोप विहिंप आणि बजरंग दल यांनी केला आहे. यामुळे भांडुप पोलीस ठाण्यात मुलुंड जिल्हा विहिंपचे सहमंत्री श्री. वशिष्ठ चौधरी आणि बजरंग दल जिल्हा संयोजक श्री. अक्षय सौदे यांनी जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात ४ जानेवारी या दिवशी तक्रार प्रविष्ट केली.