प्रभु श्रीरामचंद्रांविषयी वादग्रस्त विधान करणारे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर गुन्हा नोंद करावा !
सकल हिंदु समाजाच्या वतीने श्री क्षेत्र आळंदी देवाची (पुणे) पोलिसांना निवेदनाद्वारे मागणी !
पुणे – जितेंद्र आव्हाड यांनी भगवान श्रीरामाविषयी पुरावे देऊन वादग्रस्त विधान केले आहे, ते सर्वस्वी निंदनीय आहे. वाल्मीकि रामायणातील श्लोकाचा चुकीचा अर्थ काढून हिंदुद्वेषी जितेंद्र आव्हाड समस्त हिंदु समाजाच्या धार्मिक भावना दुखावण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांच्यावर ‘हेट स्पीच’चा गुन्हा नोंदवून न्यायालयीन कारवाई करण्यात यावी, अशा मागणीचे निवेदन सकल हिंदु समाजाच्या वतीने श्री क्षेत्र आळंदी देवाची येथील पोलीस ठाण्यात देण्यात आले. त्यासमवेत वाल्मिकी रामायणातील संदर्भही देण्यात आला आहे.
या वेळी ह.भ.प. नवनाथ शिंदे, ह.भ.प. कैलास ढगे, ह.भ.प. आदिनाथ जाधव, ह.भ.प. दिगंबर राठोड, ह.भ.प. अनिकेत हेळे आदी उपस्थित होते.
वाल्मिकी रामायणातील जोडलेला संदर्भ !
श्रीरामचंद्र आणि लक्ष्मण या दोघांनी ऋष्य, पृषत, वराह आणि रुरु जातीच्या ४ मोठ्या जनावरांची शिकार केली. त्यानंतर भूक लागल्यावर दोघांनी कंदमुळे आणून खाल्ली.