१२ जानेवारीपासून बेमुदत संपाची आशासेविकांची चेतावणी
मुंबई – राज्य सरकारने आशा स्वयंसेविकांच्या मोबदल्यात ७ सहस्र, तर गटप्रवर्तकांच्या मोबदल्यात ६ सहस्र २०० रुपयांनी वाढ करण्याचे आश्वासन नोव्हेंबरमध्ये दिले होते; मात्र दीड मास उलटूनही याविषयी शासन निर्णय काढण्यात आलेला नाही. याविषयी सरकारने तातडीने निर्णय घ्यावा, अन्यथा १२ जानेवारीपासून राज्यव्यापी बेमुदत संप करण्यात येईल, अशी चेतावणी महाराष्ट्र राज्य आशा गटप्रवर्तक कर्मचारी कृती समितीने दिली आहे.