‘दर्पण’ या वर्तमानपत्राचा प्रारंभ करणारे आचार्य बाळशास्त्री जांभेकर !’
आज आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचा जन्मदिवस (पत्रकारदिन) त्या निमित्ताने….
वर्ष १८३४ मध्ये एल्फिन्स्टन महाविद्यालयाची स्थापना झाली. त्या महाविद्यालयात रुजू होणारे आचार्य बाळशास्त्री जांभेकर हे पहिले मराठी साहाय्यक प्राध्यापक ! गणित, भौतिक आणि खगोल शास्त्र हे अवघड विषय ते शिकवायचे. दादाभाई नवरोजी, भाऊ दाजी लाड हे आचार्य बाळशास्त्री यांच्या हाताखाली शिकून गेलेले काही महान विद्यार्थी. एल्फिन्स्टन महाविद्यालयात रुजू होण्यापूर्वी आपल्या जन्मदिनी ६ जानेवारी १८३२ या दिवशी त्यांनी ‘दर्पण’ हे द्विभाषिक आणि महाराष्ट्रातील पहिले मराठी वर्तमानपत्र मुंबईत चालू केले.